आपल्या सभोवताली कितीतरी अश्या गोष्टी असतात ज्या आपण अगदी taken for granted घेतो...!
कधी विचारच करत नाही की त्या शोधल्या कुणी आणि त्यांचा अर्थ काय,
त्यांची निर्मिती कशी झाली किंवा त्या जन्मल्या तरी कश्या...
खूप 'फिलोसोफिकॅल' होतंय का...?
थोडक्यात सांगतो, परवा हाईवे नी जात होतो, रस्त्यावर जरा चहा प्यायला म्हणून थांबलो तर समोर एका मोठ्या निंबाच्या झाडाला 'टायर' टांगलेला दिसला आणि त्याच्या खाली 'अर्थातच' एक 'ग्यारेज' होते.
आता, ह्या ठिकाणी मी 'अर्थातच' हा शब्द एव्हढ्यासाठी वापरलाय कि टायर टांगलेल्या झाडाखाली 'ग्यारेज' असणारच हे सर्वाना ठाऊक आहे, किंबहुना ते तिथे आहे असे सूचित करण्यासाठीच अश्या प्रकारे तिथे टायर टांगला जातो.
कुठलाही बोर्ड नाही... काहीही लिहिलेले नाही,
तरीही, रीपेरिंगसाठी गाड्या तिकडे वळतात.
कमाल आहे नाही...?
एक दृष्य 'खुण', जी कुणी शोधली हे माहित नाही पण तिचा अर्थ सर्वज्ञात आहे.
पण मग हे कुणी ठरवले कि garage साठी हा symbol राहील म्हणून...!!
स्त्रीच्या कपाळावरचा लाल ठीबका म्हणजे ती 'विवाहित' असल्याची खुण.
भाविकाच्या गळ्यातील रुद्राक्ष सांगतो की तो 'वारकरी' किंवा कुठल्यातरी भक्ती संप्रदायाशी निगडीत आहे म्हणून
कुणाची नजर लागू नये म्हणून 'नीबू मिरची'.
कपाळावर उभा गंध असेल तर 'भय्या' म्हणायचे आणि आडवा गंध असेल तर 'आण्णा'.
करंगळी म्हणजे '.......' सगळ्यांनाच माहित आहे.
उभा अंगठा बेस्ट लक म्हणतो तर उलटा अंगठा ट्या ट्या फीस...
उभा अंगठा बेस्ट लक म्हणतो तर उलटा अंगठा ट्या ट्या फीस...
अर्थात, अलीकडच्या काळात अजून काही 'वेगळ्या' खुणांची भर पडली आहे...
जसे, हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या म्हणजे 'नगरसेवक'.
अंगात सफारी आणि हातात मोबाइल म्हणजे 'शिक्षक' (अर्थात क्लासेसवाले ...!).
भुवई वर लावलेली रिंग म्हणजे, 'क्रिएटीव्ह'.
डोक्यावर कुरळ्या केसांचा भलामोठा भोपळा म्हणजे संगीतकार माफ करा 'musician '.
हाताच्या घोटीव दंडावर ट्याटू, म्हणजे दिवसा 'फिटनेस ट्रेनर' आणि रात्री पब 'बाउन्सर'.
गणपती किंवा साई बाबा यांचे चित्र असलेली टाईल म्हणजे 'No Spitting ' चा बोर्ड.
हातात blackberry म्हणजे कमीतकमी ५० हजार पगार.
'सिगरेट' चा अर्थ होतो 'कॉर्पोरेट म्यानर्स'.
'आबा-दादा' म्हणजे राष्ट्रवादी तर 'छोटे साहेब-मोठे साहेब' म्हणजे शिवसेना.
ह्या खुणा कधी वस्तू च्या स्वरुपात असतात तर कधी शब्दांच्या,
कधी दृष्य असतात तर कधी बोलताना जाणवतात.
मजेची गोष्ट हि आहे कि अश्या कितीतरी खुणा आपल्या आजूबाजूला आहेत, गरज आहे ती फक्त थोडे लक्षपूर्वक पाहण्याची किंवा ऐकण्याची...!! कधी दृष्य असतात तर कधी बोलताना जाणवतात.
No comments:
Post a Comment