आताशा चांगला पाउस पडायला लागलाय....शेतीच्या कामांची लगबग सुरु झाली असेल...
रामप्रहरी उठून, सकाळची आन्हिक लगबगीने आवरून, शेतकरी राजा आपल्या पोरीबाळींसह निघाला असेल आपल्या शेतात...!
"असाच पाउस पडत राहिला, तर यंदा 'भात' पेरूया...
देवा विठ्ठला, पांडूरंगा असाच पाउस पडू दे रे बाबा...
पेरणी झाली कि लगेच येतो तुझ्या दारी......पंढरीची वारी...!"
भक्ती रंगली या रंगे,
वसे पांडुरंग सर्वांगे.
अबीरगुलाल उधळीत रंग
हरीभक्तीत होऊनिया दंग
पताका नारंगी झळके अंबरी
राउळीचा हिरवा घाट भरजरी
सोनेरी तेजानं सजली विठू माउली
विठ्ठल नामात दुमदुमली पंढरी.
No comments:
Post a Comment