भाग दोन - पांझरा कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष
संध्याकाळी जाऊन कारखान्याच्या डोंगरावर सूर्यास्त बघत राहणे ही जुनी सवय. समोर कारखान्याचा परिसर, बाजूला कोकले, नागाई, कासारे मालपूरची शेती. दूरवर दिसणारा चिराईबारी चा डोंगर आणि काटवानची अनेक गावे. पाठीमागे पेरेजपुरच्या पलीकडे असलेल्या सालटेकच्या डोंगररांगा. पूर्वेकडे दूर भामेर किल्ला, शेवाळी, महिर, तामसवाडी पर्यंत दिसणारा परिसर.
एका नजरेत साक्री तालुक्याचा जवळपास तीस पस्तीस टक्के परिसर अनुभवण्याची स्वर्गीय जागा म्हणजे हा कारखान्याचा डोंगर.
परवा देखील सवयी प्रमाणे तिथं होतो. त्यावेळी मनाला वाटलं ते लिहून काढलं. लेख पब्लिश होताच, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. लिहितांना मला अजिबात अपेक्षा न्हवती इतक्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांची. मी माझ्या मनातलं लिहिलं होतं. पण आज कारखाना बंद होऊनही तेवीस चोवीस वर्ष झाली तरी लोकांचे इतके प्रेम पांझरा- कानला असेल याची कल्पना नव्हती. लोकांनी उत्स्फूर्त पणे व्हॉट्स ऍप वर तो शेअर केला. वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये त्या बद्दल चर्चा घडून आल्या. अनेकांनी अगदी भावनिक होऊन आपल्या आठवणी सांगितल्या. तर काहींनी तावातावाने राजकीय चर्चा घडवून आणल्या.
कुणाचा बाप तिथं कामाला होता तर कुणाचा आजा. कुणाचं ते मामाच गावं होतं तरं कुणी नवीन संसाराला तिथून सुरुवात केली होती. कुणाच्या लेकराच बाळसं तिथं झालं होत. अनेक ज्येष्ठ कामगारांनी, शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी आपली खंत बोलून दाखवली. अनेकांनी कुठून कुठून माझा नंबर मिळवून फोन केले, मेसेजेस लिहिले.
साक्री परिसरासोबतच मुंबई-पुणे ठाणे, कल्याण, नाशिक अगदी सूरत बडोद्याहूनही मंडळीनी मेसेज केले, कमेंट्स टाकले.
पुण्याहून, एका ताईंचा कॉल आला. आपला भूतकाळ पाठीमागे टाकून आता त्या आपल्या संसारात बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत. नशिबानं आर्थिक सुबत्ता ही आहे. पण आपल्या कारखान्यातील बालपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत म्हणाल्या. कारखाना असा बंद झाल्यामुळे आई बाबांच्या संसाराची कशी लक्तर झाली हे सांगताना मात्र त्यांना गहिवरून आलं.
नाशिक चे एक ज्येष्ठ पत्रकार मित्र त्या वेळच्या दिवसांचं वर्णन करताना थकत न्हवते. त्यांच्या त्या काळच्या शाळेतील मित्रांच्या ग्रुप मध्ये लेख वाचून प्रचंड हळहळ व्यक्त झाली म्हणाले.
मुंबई पोलीस मधला एक मित्र जो स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांनी मला एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाठवला. ज्यात 1985 सालच्या स्टेट लेव्हल कब्बडी खेळाडूंचा संघ होता. हा कब्बडीचा संघ कारखान्यातील कामगारांचा होता. त्यात त्या मित्राचे वडीलही होते.
कारखाना सुरू असता तर हा संघ नॅशनल लेव्हलला खेळणार होता म्हणाला.
कारखाना बंद पडला, बेरोजगार बाप शेती करू लागला. संध्याकाळी घरी आला आणि ही मुलं कब्बडी खेळताना दिसली, तर त्यांना काठीनं मारू लागला.
माझ्या ' पक्क्या खेळाडू ', बापाला खेळाचा तिटकारा करताना बघायचो त्यावेळी कळायचं नाही, पण आता ते आठवलं की अंगावर काटा येतो म्हणाला!
दुसऱ्या एका बाईंनी खूप वर्षानंतर, कारखाना परिसराला भेट दिली होती. त्यावेळी तेथील दुरावस्था बघून त्यांना आपण उगीच तिथं आलो असं झालं होतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, डोंगरावरून दिसणारा पांझरा-कान नदीचा संगम, हिरव्या गार रंगांच्या विविध छटानीं पसरलेली शेती, खेळणारी मुले, उसाच्या गाड्या, मळीचा वास, नागाई मंदिरातील पाण्याचे झरे, केवड्याचे बन असं काहीच न्हवत. सगळं उदास, भकास उगीच गेलो असं वाटलं म्हणाल्या.
आमच्या शाळेतील एक जुना शेतकरी मित्र तर फोनवर रडायला लागला. कारखान्याच्या कार्यक्रमात तो, "जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला..." या गाण्यावर दरवर्षी नाचायचा. त्याला त्यासाठी अनेक बक्षिसंही मिळाली होती म्हणाला. आलेला हुंदका गिळत तो हळूच माझा डान्स मात्र माझ्या मुलात उतरला आहे बरं का हे डोळे पुसतच सांगू लागला...
एका सद्गृहस्थांनी सांगितलं, कारखाना माझ्या मामाच गावं. आजोबा तिथं कामाला होते. आम्हीं सुट्टीत तिथं खूप गम्मत करायचो. रस पिणे, नागाईला पोहणे, ऊसाच्या गाडीतून ऊस ओढणे, तिथल्या पटांगणावर मामाच पत्र हरवलं, क्रिकेट, विट्टी दांडू असले खेळ खेळायचो...
माझ्या स्वतः च्या आईचा एक किस्सा आहे. आता आम्ही त्यावर हसतो देखील. पण त्याकाळात तिला काय वाटले असेल याची कल्पना करवत नाही.
एका शिक्षकाची पत्नी आजारी होती. गल्लीतील इतर बायकांसोबत आई देखील त्यांना बघायला गेली. कुणी चिक्कू सोबत नेले होते तर कुणी सफरचंद. आईंनी चार रुपयाचा पार्ले जी. तो दिला त्यावेळी त्या बाई, आईला म्हणाल्या, " ताई, तू कसाले इतला खर्च करा, तुना कारखाना ते बंद पडेल शे. हाऊ पुडा परत लई जाय, तितलाच तूना लेकरे खाऊ खातीन..."
काळजी, अपमान, ईर्ष्या, हेटाळणी की अजून दुसरच काही...?
आर्थिक पिळवणूक, सांस्कृतिक दुरवस्था, राजकीय उपहास सोबत हा सामाजिक दुष्परिणाम ही तितकाच घातक होता.
प्रतिक्रिया तर अनेक होत्या. सर्वच लिहिणे शक्य नाही. पण वरच्या प्रातिनिधिक म्हणून नमूद केल्या. अजूनही अनेक असतील, ज्या माझ्या पर्यंत पोहचल्या नाहीत. कदाचित काहींना शब्दात व्यक्त होता येत नसेलही, पण त्यांच्याकडे काहीच सांगण्यासारखंच नसेल असं कुठे आहे?
आत कुठेतरी खोलवर दडून असेलच काहीतरी.
त्या कमेंट्स, मेसेजेस वाचतांना मात्र माझ्या डोक्यात वेगळेच विचार खेळ खेळू लागले.
त्या पुण्याच्या बाईंना आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतांना, कारखान्यामुळे आपल्या आई बाबांच्या संसाराची झालेली वाताहत आठवून त्यांच्या गळ्याखाली केक उतरला असेल काय?
ते पत्रकार मित्र आणि त्यांची लेखणी या अनुभवामुळे जगाकडे कायमचं दुःखी दृष्टिकोनातून बघत, लिहीत असतील का?
मामाच पत्र हरवलं, हे बालपणी खेळणारे ते गृहस्थ एक दिवस आपल्या आठवणीत भावनिक होऊन अनावधानाने माझ्या 'मामाच छत्र' हरवलं असचं तर म्हणाले नसतील?
जवा नविन पोपट हा... या गाण्यावर आपल्या उजाड शेतात नाचणारा तो शेतकरी मित्र कसा दिसत असेल?
नशिबाने खेळाडू मित्राने, खेळाची आस सोडली नाही म्हणून पोलिसात लागला. बापाच्या भीतीनं त्यानी खेळणं सोडून दिलं असतं तर?
मला स्वतःला स्ट्रगलिंगच्या दिवसात पार्ले-जी च्या त्या बिस्किटाचा आधार होता पण जर मी ते हेटाळणीच बिस्कीट नाकारलं असतं तर त्या चार रुपयात माझं पोट भरलं असतं का?
एखादं गाव, एखादं ठिकाणं, एखादी जागा... तुम्हाला किती देऊन जाते... पण त्याचीच जर जखम झाली तर तुमचं सर्वस्व सोबत नेते!
तुम्ही म्हणाल, प्रकल्प बंद होत नाही का, कंपन्या डबघाईला जात नाहीत का... अनेक प्रायव्हेट प्रोजेक्ट ही बंद पडतात, तिथं हा तरं सहकारी?
अहो, सहकार चळवळीतून उभा राहिला होता म्हणूनच तर वाईट वाटतंय. आमच्या कामगारांच्या, शेतकऱ्याच्या शेअर्सवर उभा राहिलेला उपक्रम. तालुक्यातील एकमेव उद्योग. असा अवेळी बंद पडतो. कुठलेही ठोस कारण न देता?
एक साधी नोटीस ही नाही?
कामगारांना एक साधं पत्रही नाही, की उद्या पासून कामावर येऊ नका म्हणून...
शेतकऱ्यांना साधा निरोप नाही, की जुनं पेमेंट तर विसराच पण पुढच्या वर्षापासून ऊसही लावू नका...
कामगार रोज आशेने ड्युटी वर येत राहणार...
शेतकरी चक्कर मारत राहणार...
एकदिवस तिथली एस टी बंद होईल.
मग स्वतःच्या फटफटी वर येणार...
शेवटी फटफटतीत टाकायचं पेट्रोल ही परवडेनासे होईल... मग स्वतःच बंद करेल तिथं येणं...!
हे असं, ' बंद करणं ', केंव्हा आणि कसं ठरवलं असेल त्यांनी? आणि पुढच्या क्षणी काय निर्णय घेतला असेल?
तालुक्याचे ठिकाण सोडून गावी परतण्याचा?
तिथं असणारी दोन-पाच एकर जमीन कसण्याचा?
त्या जमिनीचा वाटा कसा मागितला असेल भांवडांकडून? दिरानी-जेठाणीचे त्यावरून वाद झाले नसतील कशावरून?
कदाचित गोष्टी कोर्ट-कचेरी पर्यंत तर गेल्या नसतील ना?
की मग, तालुक्यातच राहून तो किंवा त्याची पोरं दुकानात कामाला लागली असतील? कारखान्यात मिळायचा त्या पगाराच्या कदाचित फक्त वीस टक्के प्रमाणात?
त्यातलं एखादं पोरगं गणितात हुशार असेल ही , पण आता ते शिक्षण सोडुन आठवडे बाजारात झिंगे - बोंबिल विकून वजन काट्यावर हिशोब करत नसेल कशावरून?
एखाद्या पोराला इतिहास नागरिकशास्त्रात गती असेल, आता ते तुमच्या राजकारण्यांच्या जीपांमागे झेंडा धरून धावत असेल. चिकन - मटण आणि दारूच्या लालसेपायी पोट तिडकीन तुमच्या नावाच्या झिंदाबादच्या घोषणा देत देत, एक दिवस लिव्हर खराब होऊन मेला नसेल कशावरून?
कारखान्याचे राजकारण संपलं तरी तुमच्यासाठी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, झेड पी, आमदारकी, खाजदारकी असेल.
फार्म हाऊसवर तुमचं पोरगं जेंव्हा व्हाईट सदरा, व्हाईट पॅंट, व्हाईट शूज, मनगटात सोन्याची घड्याळ, गळ्यात सोन्याची चेन घालून आरश्यासमोर बघत उभा राहत असेल त्यावेळी कोण अभिमान वाटत असेल नाही, तुम्हाला तुमच्या राजबिंड्या पोराचा...?
त्यावेळी, तुमच्या मनात जरा ही विचार आला असेल का हो... की आमच्या देशोधडीला लागलेल्या कामगारांची, पिचलेल्या शेतकऱ्यांची पोरं दूर चाकण, सातपूर, सिन्नर, तळोजा, वापी, वाडाच्या कुठल्यातरी MIDC मध्ये लोखंड वितळवत असतील, गोण्या उचलत असतील नाहीतर निळे एप्रन घालून फिटिंगची कामे करत असतील...
शहरात परवडत नाही म्हणून त्यांचा बाप पायली पायली गहू बाजरी एस्टी मध्ये, लोकल मध्ये टाकून, शहरात येत असेल... बिचारा गर्दीला बिथरून जात असेल. शेवटी कसा तरी सांगवी, भोसरी, मुंब्रा, कळवा, दमन, सूरतच्या कुठल्या तरी गलिच्छ गल्लीत पोराचा संसार बघायला येत असेल.
ते पोरगं निघतांना स्वतःचा महिन्याचा हिशोब ठेऊन आपल्या बापाच्या हातात, बायकोला लपवत, किडुक- मिडूक काहीतरी टेकवत असेल.
त्या परतीच्या वाटेवर त्या बापाला काय वाटत असेल हो?
प्रवासभर तो काय विचार करत असेल?
तुमची मुलं-नातरे डुन स्कूलला शिकली असतील.
इंग्लिश फाडफाड बोलत सुट-बूट घालतं कधीतरी गावी चक्कर मारून इथल्या तुमच्या प्रगती बद्दल बोलत असतील...
त्यावेळी आमच्या कारखान्याच्या कामगाराचं, शेतकऱ्याचं पोर बाजरपट्टीतील कुणा सिंधी किंवा मारवाड्याच्या दुकानावर पुड्या बांधत असेल किंवा तोंडात गुटखा खात खात रेडिमेड स्टोअर्स मध्ये बनियान अंडर पॅन्टच्या घड्या घालत असेल...
त्याच्या तोंडात वर्षानुवर्ष साचलेले ते गुटखारुपी विष तुमच्या नावानं गावाच्या वेशीवर थुंकला तरं चालेल का हो...?
चला क्रांती नाही पण त्याच्या समाधानासाठी तो इतकं तर निश्चितच करूच शकतो की!
(कुणीतरी म्हणाले, व्हॉट्स ऍप वर लेख वाचला पण खाली कुणी लिहिला हे नावं न्हवत म्हणून समजलं नाही. मी म्हणालो, नाव लिहून काय करायचं आहे. शब्द माझे असले तरी भावना आपल्या सर्वांच्याच नाहीत काय...?)
(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)

No comments:
Post a Comment