परवा साधनाताई गेल्या, ३ वर्षापूर्वी बाबा आमटे गेले तश्या.....
काही लोकांना आपण कधीच भेटलेलो नसतो त्यांच्याशी कधी बोललो हि नसतो, पण मग त्याचं असं अचानक जाण जीवाला चटका लावून जात.
बाबा आमटे आणि साधनाताई यांच्या विषयी शाळेत असल्यापासून ऐकायला मिळायचं...
तेंव्हा वाटायचं कि आपण देखील असं इतरांसाठी काहीतरी करायला हव...
इतरांच जगण सुदंर बनवायला हवं...
पण मोठ झाल्यावर कळल कि, किती कठीण असत दुसऱ्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेण...स्वतःच्या स्वप्नांचा, अपेक्षाचां त्याग करून निस्वार्थी जगण...
आपण आपल्या तळहातावरच्या 'रेषा' बघतो असतो,
स्वतःच भविष्य जाणून घेण्यसाठी या रेषांचा अर्थ ही लावतो असतो...
आणि मग त्या आहेत तसे आणि त्यां प्रमाणेच जगत असतो...
पण बाबा किंवा साधनाताई यांच्यासारखी लोक आपल्या रेषा स्वतः लिहित असतात...!
रेषा प्रारब्धाच्या,
समृद्ध जाणिवानी जगण्याच्या
रेषा संघर्षाच्या,
आड वाटेवरती भेटलेल्या निश्चयाच्या
रेषा म्हणजे गुंतागुंत,
रेषा म्हणजे आरंभ,
प्रकाश्याच्या सावली आड डोकावणाऱ्या, रेषा
क्षितिजा पलीकडे झेपावणाऱ्या, रेषा
अनुभवांनी समृद्ध झालेल्या, रेषा
स्वतःचा प्रारब्ध स्वतः घडवणाऱ्या रेषा

No comments:
Post a Comment