नेमीच येतो पाऊस...! या उक्क्ती प्रमाणे नेहमीच होतात मुंबईत ब्लास्ट...असं म्हणायला कुणाचीच हरकत नसावी...
खर तर या वेळी थोडं लेटच झाल म्हणायचं...पाउने तीन वर्ष म्हणजे जरा जास्तच होतात नाही...!
काल संद्याकाळी जेंव्हा बातमी समजली तेंव्हा ऑफिसातच होतो.
नेहमी प्रमाणे सर्वीकडे टीव्ही चालू होते.
प्रत्येक जन आपल्या आप्तेष्टांना फोन करून समाधान करून घेत होता...
आणि हे सर्व फक्त काही मिनिटच...!
त्यानंतर सर्व पूर्ववत, जो तो परत आपापल्या कामात.
वास्तविक एखाद्या न्यूज च्यानल च्या ऑफिसात कसे धावपळीचे वातावरण असायला हवे... पण काल तसलं काहीही नव्हत.
मला वाटत, भारत पाक सामना किंवा वल्ड कप क्रिकेटच्या वेळी जास्त धावपळ असते आमच्या ऑफिसात...!
सर्वीकडे अगदी शांतता...जस काही आता सर्वांनाच सवय झाली आहे अश्या बातमीची...
कुणालाच घरी जायची घाई नाही कि चेहऱ्यावर कसलीही भीती नाही...
सगळीकडे एकदम थंड...!
कसलाच संताप नाही.
कुणी, केंव्हा किंवा कसे ब्लास्ट घडवले असतील अशी कुठलीही चर्चा नाही...
इंडिअन मुजाहिदीन आहे कि लष्कर ऐ तोयबा...कुणालाही काहीही घेण नाही...
नाहीतरी आता ही नाव म्हणजे नेहमीचीच झाली आहेत आपल्या सर्वाना.
जसे हनुमान व्यांयाम शाळा, रोटरी क्लब किंवा ललित कला मंच, तस लष्कर ऐ तोयबा...!
काल तसा पाऊसही खूप पडत होता मुंबईत...
रात्री घराकडे निघालो तर रस्ते देखील नेहमी सारखे...वाहनांनी भरलेले.
ट्राफिक पोलिसचा चेहरा जरा कातावलेला दिसला, कदाचित आता रात्र रस्त्यावर उभ्यानेच काढावी लागेल म्हणून असेल...
एक हा बदल सोडला तर बाहेर सर्व नॉर्मल...
घरी जाऊन परत न्युज बघण्याची अजिबात इच्छा न्हवती.
तेंव्हा आपली नेहमीची डेली सोप...
मुंबई बाहेरील नातेवाईकांचे सारखे फोन येत होते, आम्ही ठीक आहोत का विचारण्यासाठी...
काय बोलाव कळत नव्हत.
काय सांगणार त्यांना कि आम्हाला याची सवय झाली आहे म्हणून...
कारण खरंच, काही म्हणजे काहीच वाटत न्हवत...
क्षणभर वाटल कि आपण माणूस आहोत कि नाही...
कसला संताप नाही कि हळहळ नाही...भावना बधीर झाल्या प्रमाणे...
एरवी रस्त्यावर रिक्षाने जरा कट मारला तरी ओठांवर शिवी येते, पण काल कुणाविषयी काहीही वाटत न्हवते...
आज सकाळी पेपर मध्ये नेहमीप्रमाणे मुंबई हादरली वैगरे बातम्या...
वाचायचा मुडच होत नाहीये...
सकाळी रस्त्यांवर पुन्हा ट्राफिक...शाळा, हॉस्पिटल्स, ऑफिस सर्व चालू...
आता बरेच लोक याला 'मुंबई स्पिरीट' वैगरे म्हणतील नेहमीप्रमाणे...
मोबाइल वर मेसेजेस येतायत, शिट टेररीझम किंवा शेम ओंन...इत्यादी,
पण ते वाचून संताप होण्याऐवजी उलट हसू येतंय...!
काय करू आता आमच्या भावना, संवेदना बधीर झाल्यात...नेहमीप्रमाणे...!!
No comments:
Post a Comment