गंध (भाग दोन)
[भाग एक वाचण्यासाठी याच टाइम लाईन वर खाली स्क्रोल करा]
‘बाली’ हे इंडोनेशिया या देशातील टूरिस्ट डेस्टिनेशन. पहिल्यांदा देशाबाहेर गेलो ते या ठिकाणी. समुद्र किनाऱ्यावर वसलेले अत्यंत सुंदर शहर. विमान जोवर प्रत्यक्ष जमिनीवर लॅन्ड होत नाही तोवर सतत भीती वाटत असते कि, हे पाण्यावर उतरतय कि काय. इतकी ती समुद्राच्या काठाला लागून असलेले धावपट्टी...! त्यामुळे, विमानाच्या खिडकीतून पाहिल्यास निळ्याशार समृद्राच्या त्या पाण्यात आणि बालीच्या हिरव्यागार भूपृष्ठात कमालीचा शृंगार जाणवतो.
विमानतळापासून ते हॉटेल पर्यंत एक विशिष्ट गंध मला जाणवत होता. सुरवातीला वाटलं, आपण पहिल्यांदाच परक्या धर्तीवर आलोत म्हणून हे वेगळेपण वाटत असावे. पण जेंव्हा शहरभर फिरलो. तिथल्या मंदिरांना, समुद्र किनाऱ्यांना भेटी दिल्या त्यावेळी कळलं तिथे बहुतांश ठिकाणी एक विशिष्ट वनस्पती होती आणि तिचा तो गंध होता, आपल्याकडे पुदिनाच्या पानांचा असतो तसा. जो तेथील चराचरात मिसळून गेला होता. आजही कधीतरी कुठल्या मॉल किंवा थियेटर ला गेलो कि तिथल्या बंदिस्त वातानुकुलीत वातावरणात रूम फ्रेशनर चा तोच गंध मला जाणवतो आणि बाली ची भेट आठवते.
सकाळी, ‘बाली’ च्या रस्त्यांवरून फेरफटका मारत होतो. सोबतीला ‘मिंट फ्रेश’ गंध होताच. दुकानं नुकतीच सुरु झाली होती. इथल मार्केट म्हणजे आपल्या सारखं गर्दीच नाही. खूप सुटसुटीत. शांत. एका गल्लीच्या कोपऱ्यावर उभा होतो. समोर एक रेस्टोरेंट होते. आपल्याकडे जुने वाडे असतात त्या प्रमाणे दिसणारे. बाहेर फुलझाडे. अंगण रस्त्याला लागून, सकाळी त्यावर पाणी मारून स्वच्छ केलेले.
दुरून एका इंडोनेशियन स्त्रीला बघितले. तिने आपल्या त्या अंगणात एका लोखंडी पाटी मध्ये काही लाकडे पेटवलेली होती. कुतूहल म्हणून जवळ जाऊन बघितले तर त्यावर रेस्टोरेंट मधील पहिली डिश तिने त्या अग्नीला अर्पण केली होती. कोरड्या लाकडात पेटणार ते अन्न, तो अग्नी आणि त्यातून निर्माण होणारा धूर गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत आलाच. जिथे मी उभा होता. क्षणभर त्या धुरामुळे मला ठसका जाणवेल असं झालं तर दुसऱ्याच क्षणाला तो धूर मला गावी घेऊन गेला. पितृ पक्षात आजोबांचे आणि काकांचे श्राद्ध असायचे. वडील ते नियमाने पाळत. आपल्या जेष्ठ भावाच्या आणि वडिलांच्या आठवणी आम्हाला सांगायचे. त्याच वेळी आई ने लाकडं पेटवलेली असायची. आम्ही आपल्या ताटातून पुरण पोळीचा एक तुकडा घेऊन त्यावर खीर, सार भात, भाजी आणि ताटातील सर्व जिन्नस एक एक करून टाकायचो. नंतर ते उचलून त्या अग्नीत समर्पित करायचो. वर ते पेटावे म्हणून दोन पळी तूप. त्यावेळी त्या अग्नीतून जो गंध निर्माण व्हायचा तोच मला बालीच्या या गल्लीत जाणवत होता. वडील त्या अग्नीला नमस्कार करून आपले जे आप्तेष्ट हयात नाहीत त्यांचे स्मरण करायचे. त्यांना जेवायला या म्हणून सांगायचे. त्या निमित्ताने आपण त्यांची आठवण तरी काढतो अशी त्यांची धारणा होती. आम्ही हि मग निरागसपणे आबा, दाजी, ताई अशी नाव घ्यायचो... बालीच्या त्या अनोळख्या गल्लीत मी त्या दिवशी नकळत असेच दुरून डोळे मिटून घेतले होते. आणि हि सर्व नाव पुटपुटलो होतो.
दुसरी आठवण आहे ती जर्मनीतील, म्युनिक या शहराच्या विमानतळा बाहेर च्या अनुभवाची. मुंबईतील मे महिन्याच्या कडकडीत उन्हातून दूर युरोप ला निघालो होतो. वाटेत दुबई. मुंबईच्या टर्मिनल टू पासून दुबई चे DXB एअर पोर्ट. मग थांबा. पुन्हा नवीन फ्लाईट. शेवटी म्युनिक इअर पोर्ट. जवळपास पंधरा सोळा तासांचा प्रवास. तीन विमानतळ आणि दोन फ्लाईटस. सर्वीकडे बंदिस्त ए सी आणि तेथील रूम फ्रेशनर चा एक विशिष्ट वास. जो या काही तासात सवयीचा होऊन जातो. आणि जेंव्हा तुम्ही अचानक मोकळ्या वातावरणात येता तेंव्हा तो फरक प्रचंड जाणवतो.
इमिग्रेशन चे सोपस्कर पार करून म्युनिक विमानतळा बाहेर पडलो तर अचानक झटका लागावा असं झालं. पूर्वी कधीही न अनुभवलेलं ते वातावरण. मुंबईच्या पस्तीस चाळीस डिग्री सेल्सिअस मधून म्युनिक च्या चौदा पंधरा डिग्री मध्ये गारठ्या बरोबर तेथील हवेत एक अत्यंत फ्रेश गंध जाणवला. मी अंगात कोट आणि नाकात हा गंध साठवून घेत होतो. अजून बस यायची होती. विमानतळ तसे छोटे पण शांत वाटत होते. ओळीनी येणाऱ्या टैक्सी, शिस्तीती उभ्या असलेल्या बसेस, एका रेषेत आपल्या व्हील बैग्स नेणारे गोरे प्रवासी बघून, हिटलर च्या भूमीतील शिस्त जाणवली.
बस शहराला वळसा देऊन आता हायवे ला लागली होती. जर्मनीतील हे ‘म्युनिक’ ते चेक रिपब्लिक या देशातील ‘प्राग’ शहरा पर्यंत मला प्रवास करायचा होता. सहा - सात तासांच्या या रोड जर्नी बद्दल मी खूपच उत्सुक होतो. खिडकीतून येणारा मोकळा थंडगार वारा आणि समोर दिसणारी तेथील छोट्या टुमदार गावांची दृश्य.
मधेच पाईन वृक्षांचे एखादे छोटे जंगल, तर रस्ता ओला करणारा भुरभुर पाउस. आपण कुठल्यातरी थेटरात बसून शाहरुख खानचा सिनेमा बघतोय कि काय अशी माझी अवस्था. रिफ्रेशमेन्ट साठी बस हायवे ला लागून असलेल्या एका पेट्रोल पंप कम ढाब्यावर थांबली होती. आमची बस सोडली तर तिथे कुणीच न्हवत. इतक्या मोठ्या शॉप मध्ये फक्त एकच म्हातारा तो हि काउंटर वर. मला क्षणभर वाटलं कि आता लगेच DDLJ चा शाहरुख आपल्या मित्रांसोबत ओपन कार मधून जंप मारून येईल आणि समोर बसलेल्या या म्हाताऱ्याला पेन किलर टेबलेट्स द्या म्हणून खोटंच सांगून समोरचा बियर केरेट उचलून नेईल...
चिर्रर...करून मित्राने बिअर कॅन ओपन केला आणि माझ्या समोर धरत...lets take it, cheers म्हणत माझ्या हाती हि सोपवला. मी मघास पासून त्या बियर च्या रैक कडे बघत होतो म्हणून कदाचित त्याला हावरट वाटलो असेल कि काय असा विचार डोक्यात येऊन गेला क्षणभर. पण फेसाळत्या कॅन कडे दुर्लक्ष करून चालणार न्हवत. मी मनोमन DDLJ च्या राज मल्होत्रा ला चिअर्स करत कॅन तोंडाला लावला. बियर चा तो वास मला नौकरीच्या स्ट्रग्लिंग डेज मध्ये घेऊन गेला.
आठ हजार पर मंथ पगारावर मी जाम खुश होतो. बोरीवली ते अंधेरी रोज प्रवास करावा लागायचा. बारा-पंधरा तास कामाची नौकरी. थकून जायचो. पण आपण पगार कमावतो याचा आनंद इतका असायचा कि कामाचं काही वाटायचं नाही. त्यात रविवार ऑफ. बालपणीचे मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात असूनही एकाच रूमवर राहायचो. सर्वांची परिथिती जवळपास सेम. त्यातील एकाला कंपनीकडून ‘सोडेस्को’ चे कुपन मिळायचे. त्या कुपनवर रविवार आम्ही पार्टी करायचो. पाच कुपन दिले कि तीन बिअर, ग्रीन सलाड आणि भरपूर चखना मिळायचा. संध्याकाळचा मंद प्रकाश, पेपरवर अंथरलेली बिअर मग्स, चखना, सलाड, बॉईल्ड एग्स आणि काही कार्यकर्त्यांच्या हातातील सिगरेटस मिळून एक कुबट, आंबट वास निर्माण व्हायचा. त्या बंदिस्त वातावरणात, एक कमालीचा ‘फ्रीडम फील’ होता. मग जो तो आपल्या कामाचे, आयुष्याचे फ्रस्ट्रेशन काढायला लागायचा. कुणी बॉस ला शिव्या द्यायचे तर कुणी आपल्या परिस्थितीला बोल लावायचे. एखादा आपल्या ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीच्या नावानी रडायचा. मग सर्वच त्या आंबट – कुबट वासात त्याच सांत्वन करायचे. जोरजोरात शिव्या द्यायचे. सुरवातीला दूर असणारा मी, शिव्या देण्यात कधी एक्स्पर्ट झालो हे मला हि कळलं नाही.
तो आंबट कुबट वास मला माझ्या आतील विकृतीची आठवण करून देतो. अशी विकृती जी आतमध्ये खोलवर दबून, सर्वच निमुटपणे सहन करत असते. वर एक मुखवटा घेऊन सतत चांगुलपणाचा आव आणत असते. मग अश्या एखाद्या प्रसंगी बिअर आणि चखण्याचा तो आंबट-कुबट वास ती विकृती बाहेर काढते. आणि आयुर्वेदातील ‘वमन’ केल्याप्रमाणे शरीर आणि मन दोघेही साफ होऊन जातात. नदीकाठच्या वाळूच्या तळ्याप्रमाणे!
लहानपणी गावभर उनाडक्या करून आम्ही थकलो कि नदीकाठी पाणी प्यायला जायचो. सरळ नदीतील पाणी न पिता बाजूला वाळूत एक खड्डा खोदायचो. त्यात हळूहळू पाणी जमा व्हायचं. सुरवातीला ते गढूळ असायचं. ते पाणी उपसून काढलं कि नंतर स्वच्छ निर्मल पाणी उरायचं. जसा बिअर चा शेवटचा कॅन संपल्या नंतरच्या पहाटेचा मोकळा वारा आणि त्याचा मिंट फ्रेश गंध...
(क्रमश.)